top of page
Helping Hands

सदस्यत्व.

सदस्यत्वाचे फायदे.

  • या संस्थेचे सदस्यत्व स्वीकारून किंवा  स्वयंसेवक म्हणुन व्यापक आणि विविध  सेवा निरपेक्षपणे करता येइल किंवा अशा सेवांना हातभार लावता येइल.

  • मग तुमची श्रध्दा आणि आवड तीर्थक्षेत्र आणि देवपुजा संबधित असो किंवा  वैद्यकिय सेवा संबधित,

  • महीला आणि बाल कल्याण असो की सामजिक प्रबोधन., पर्यावरण संतुलनापासुन ते कायदेशीर लढाई पर्यंत आणि प्राचीन ग्रंथ संरक्षणा पासून ते  आधुनिक मीडिया आणि प्रशासनापर्यंत अनेक क्षेत्रांत एकाच वेळी सामूहिक प्रयत्न आणि सेवा यामधून अध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध सेवा उपलब्ध असतील.

  • आम्ही  विद्यार्थी वर्गापासुन ते शिक्षक -  प्राध्यापक वर्गापर्यंत,  वकिलांपासून  पत्रकारांपर्यंत, पोलिस पासून डॉक्टर आणि पॅरामेडिकल तज्ञपर्यंत, accountants  पासून managers पर्यंत, चीत्रकारापासुन ग्राफिक डिझाईनर पर्यंत तसेच सॉफ्टवेअर इंजिनिअर पासुन सिव्हिल इंजिनिअर पर्यंत अनेक क्षेत्रातील सभासद आणि सदस्य तसेच स्वयंसेवक यांचे  संस्थेच्या उपक्रमांत सामील होण्यासाठी खुल्या मनाने स्वागत करतो. तुमचे skills आणि experience  चांगल्या कार्यात उपयोगी यावेत हाच आमचा प्रयत्न असेल.

  • तसेच सारखी आवड आणि हेतू असलेल्या व्यक्तींसोबत सेवा करण्याचा आनंद वेगळाच असेल.  तो तुमचा take home benefit.

स्वयंसेवक

  • पात्रता सेवा करण्याची आवड, नीतिमूल्य आधारीत वर्तणूक आणि शक्य असेल तेंव्हा थोडासा वेळ  या पात्रता आहेत स्वयंसेवक म्हणुन कार्य करण्यासाठी.

  • कुठलीही fees किंवा वर्गणी नाहीं आणि कुठल्याही सेवा बंधन कारक नाहीं.

  • तुमच्या आवडीनुसार आणि सवडीनुसार कुठे सेवा करायची, कधी करायची, किती वेळ करायची तुम्ही ठरवा आणि आम्ही जवळपास सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.. संस्थेच्या वेबसाईट वर सर्व उपलब्ध सेवांची यादी असेल तुम्ही त्यामधूनही निवडू शकाल..

चला तर मग एक सर्वोत्तम सेवा सुरू करण्यासाठी लवकर पुढें या  ऑनलाईन रजिस्टर करा...

  • पात्रता –

    • स्वयंसेवक बनण्यासाठी वयाचे कुठलेही बंधन नाही.

    • त्यांना कुठलेही आर्थिक वर्गनी देणे बंधनकारक नाही

    • पासपोर्ट आधारकार्ड , मतदान कार्ड , शाळा ओळखपत्र इ. पैकी एक डॉक्युमेंट

 

  • अपात्रता -

    • संस्थेने  ठरवून देलेले नियम मोडल्यास किंवा शिस्तभंग केल्यासा स्वयंसेवक जबाबदारी तुन मुक्त केले जातील.

  • जबाबदारी –

    • स्वयंसेवक संस्थेच्या वेबसाईटवर आपली माहीती भरून अर्ज करतील आणि संस्थेकडे उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील सेवांमध्ये त्यांचा शारीरीक, मानसिक श्रमदान आणि वेळ देऊन सहभाग घेतील स्वयंसेवकही ऐच्छिकदान देवु शकतील

    • संस्थेकडे उपलब्ध असलेल्या सेवा सामान्यपणे खालील क्षेत्राशी संबंधीत असतील -

1) अध्यात्मिक सेवा

2) सामाजिक सेवा

3) अकाउंट आणि वित्त व्यवस्थापन

4) इंजिनीअरींग आणि बांधकाम

5) इलेक्ट्रीकल , प्लंबिंग , मेकॅनिकल इ . तांत्रिक सेवा

6) सरकारी कार्यालये आणि कायदेविशयक सेवा

7) वैद्यकीय सेवा आणि रुग्ण सेवा 

8) अन्नदान संबंधित सेवा 

9) धर्मिक कार्यक्रम आणि उत्सव संबंधीत सेवा आणि श्रमदान

10) माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर

11) वाहतुक आणि ड्राईव्हिंग संबंधीत सेवा

12) संस्थेकडे उपलब्ध असलेल्या सर्व सेवा

सभासद.

ज्या सज्जन आणि सेवाभावी लोकांना संस्थेच्या विविध प्रकल्पांमध्ये आणि उपक्रमांमध्ये आपला खारीचा वाटा द्यावयाची इच्छा असेल त्यांचे सामान्य सभासद बनण्यासाठी आम्ही स्वागत करत आहोत.

  • पात्रता-

    • कुटलेही सेवाभावी व्यक्ती

    • पासपोर्ट , आधारकार्ड , मतदान कार्ड , पॅनकार्ड , रेशनकार्ड , शाळा कॉलेज आयडी इ पैकी एक ओळखपत्र वयाची कुठलीही अट नाही.

    • सभासद फी / वर्गनी सभासद होते वेळी १०१ ( एकशे एक ) इतके अंशदान देवुन कोणीही सभासद बनु शकतो. त्यांना संस्थेकडून एक डिजीटल मेंबरशिप कार्ड दिले जाईल.

 

  • अपात्रता -

    • कुठल्याही सभासद व्यक्तीने संस्थेने घालवून दिलेले नियम मोडल्यास किंवा संस्थेच्या सेवांमध्ये कुठलाही गैरव्यवहार केल्यास त्यांचे सभासदत्व कुठलीही पुर्व सुचना न देता संस्थेचे पद अधिकारी त्याच क्षणी त्या व्यक्तीस बरखास्त करु शकतील या बाबतीत संस्थेचा नियम अंतीम असेल.

 

  • कार्यकाळ-

    • सभासद एक वर्षापर्यंत संस्थेशी जोडलेले रहातील पुढील वर्षी त्यांना पुन्हा नव्याने वर्गनी भरूण सभासदत्व घेता येईल पण एका वेळेला जास्तीत जास्त एक वर्ष इतका सभासद कालावधी राहील.

 

  • अधिकार -

    • सामान्य सभासद वर्षातून एकदा संस्थेच्या वेबसाईटवरून किंवा कार्यालयातून संस्थेने निर्धारीत केलेली फी भरुण संपूर्ण आर्थिक वर्षातील हिशोबांच्या प्रती अर्ज देऊन मागवु शकतील.

    • संस्थेची पुर्व परवानगी घेउन संस्थेच्या कार्यासाठी ठरवून दिलेल्या मर्यादेत केलेल्या खर्चाची योग्य बिले देवून संस्थेकडून भरपाई मागणे या व्यतीरिक्त सामान्य सभासदांकडे कुठलेही अधिकार नसतील.

 

  • जबाबदाऱ्या -

    • शक्य असेल तेव्हा संस्थेच्या सेवाभावी कार्यत धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होने आपल्या इच्छेनुसार आणि वेळेनुसार शारीरीक मानसीक श्रमदान करणे तसेच ऐच्छिक दान करणे विविध निर्थक्षेत्रे आणि मंदिरे आणि धार्मिक उत्सव , कार्यक्रम या ठिकाणी स्वयं सेवक म्हणून कार्य करणे संस्थेच्या सर्व सेवा ऐच्छिक असतील आणि सेवा करण्याचे किंवा न करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य सभासदाला असेल.

***संस्थेने वेळोवेळी आणलेले नविन नियम किंवा दुरुस्त्या  पालन करणे  सर्व सभासदांवर बंधनकारक  राहतील.***

contact us for any query!!!

स्वयंसेवक सदस्यत्व

₹0

0

Valid until canceled

स्वयंसेवक सदस्यत्व

Best Value

सर्वसाधारण सदस्यत्व

₹100

100

Every year

Valid for 2 years

सर्वसाधारण नोंदणी

​आपली नोंदणी प्रकार निवडा. 

तुमच्यासाठी योग्य असलेले शोधा...

bottom of page